रिलायन्स जिओ’च्या जिओ फोनचं प्री-बुकिंग सुरू

0
2935

‘रिलायन्स जिओ’च्या बहुचर्चित जिओ फोनचं प्री-बुकिंग आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे. तुम्हालाही हा फोन बुक करायचा असेल, तर ५०० रुपये आणि इंटरनेट कनेक्शनसह पाच वाजता तय्यार राहा.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ग्राहकांना सुखद धक्का दिला. फोरजी फोन ‘चकटफू’ देण्याची घोषणा त्यांनी केली होती. एकापेक्षा एक हायटेक फीचर्सनी सज्ज असलेला हा फोन ‘शत-प्रतिशत’ भारतीय असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे मोबाइलप्रेमींना या फोनबद्दल उत्सुकता आहे. याच जिओफोनचं प्री-बुकिंग आज सुरू होतंय.

जिओफोनसाठी १५०० रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागणार असली, तरी आगाऊ नोंदणी करताना ५०० रुपयेच भरावे लागणार आहेत. उर्वरित १००० रुपये मोबाइल मिळाल्यानंतर द्यायचेत. रिलायन्सच्या संकेतस्थळावर, मायजिओ अॅपवर आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये हा फोन बुक करता येणार आहे. सप्टेंबरपासून तो ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होईल. दर आठवड्याला ५० लाख जिओफोन बाजारात आणण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.