राहुल ,सुशीलची ‘सुवर्ण’कामगिरी

0
1796

 गोवाखबर: बीडचा पैलवान  राहुल आवारेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपद पटकावले आहे. राहुलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं.दरम्यान 73 किलोच्या वजनी गटात यशस्वी कमगिरी करत सुशील कुमारनेही सुवर्णपदक पटकावले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बीडचा पैलवान राहुल आवारेने सुवर्णपदक जिंकले आहे. 57 किलो वजनी गटात त्यांनी 15 गुण मिळवत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीचा पराभव केला. स्टीव्हन तकाशीला 7 गुण मिळाले.  राहुलने आक्रमक खेळी करत सुरुवीपासूनच  वर्चस्व निर्माण केलं. यामुळे कॅनडाच्या पैलवानाला संधीच मिळाली नाही. उपांत्य फेरीत राहुलने पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा 12 विरुद्ध 6 गुणांनी पराभव केला होता.त्यानंतर या स्पर्धेत 73 किलोच्या वजनी गटात यशस्वी कमगिरी करत सुशील कुमारनेही सुवर्णपदक पटकावले आहे.भारताने आतापर्यंत 14 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.