राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाचे आपकडून स्वागत

0
67
गोवा खबर : आम आदमी पक्षाने आज राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या आदेशाचे स्वागत केले,ज्यामधे गोवा सरकारला तटीय विभाग व्यवस्थापन योजनेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत आणि चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या योजनांविरोधात लढा उभारलेल्या स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्थेच्या सदस्यांचे आभार मानले.
गोवा आणि गोव्याचे हितसंबंध विक्री केल्याबद्दल ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी भाजप सरकारवर टीका केली.
शेवटच्या क्षणी जागा बदलली गेली आणि त्यामुळे बहुतेक लोकांना तथाकथित सार्वजनिक सुनावणीत स्वत: ची नोंदणी करूनही त्यांना भाग घेण्याची परवानगी नसल्यामुळे सीझेडएमपीवर झालेली सार्वजनिक सुनावणी हा फक्त एक विनोद असल्याची त्यांनी आठवण करून देत, जनतेला रस्त्याच्या कडेला बाहेर बसण्यास मजबूर केले गेले, हे नमूद केले.
पणजीमधील सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या राहुल म्हांबरे यांनी कार्यवाहीबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या आहेत की “ही कार्यवाही नाटक आहे आणि व्यासपीठावर बसलेल्या अधिकाऱ्यांना स्वत: ची लाज वाटली पाहिजे.
सकाळी ११ वाजता नोंदणी उघडेल असे सूचनेत असूनही तेथे कोणताही काऊंटर नव्हता आणि त्यांनी लोकांना किंबहुना आतल्या वृद्धांनासुद्धा याचा फायदा घेत त्यांची परवानगी नाकारली. आमचे म्हणणे ऐकले पाहिजे हा प्रत्येक गोयंकरचा अधिकार आहे! या योजना ग्रामस्तरावर जाऊन मंजूर करुन घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे.”
ते म्हणाले की, सरकारने आता ही योजना प्रत्येक संबंधित गावाला पाठवावी आणि ग्रामस्थांकडून मंजूर करुन घ्यावी आणि त्यानंतरच राज्य सीझेडएमपीमध्ये याचा समावेश केला जावा, असे न केल्यास ते म्हणाले की, हे दूसरे काही नसून आणखी एक सरकारकडून केलेले प्रहसन मानले जाईल.
तटीय विभाग व्यवस्थापन योजना गावकऱ्यांच्या छाननीसाठी पाठवावी आणि गावकऱ्यांनी मान्यता दिल्यानंतरच ती मंजूर व्हावी, अशी मागणी करण्याचे आव्हान त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना केले.
हे सरकार पूर्णपणे कोसळले आहे आणि कोर्टाच्या निर्देशानुसार आता कोविड समस्येवर आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या निर्देशानुसार पर्यावरणविषयक समस्यावर काम करत आहे, असे म्हांबरे यांनी सांगितले.