राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
112

गोवा खबर : गोवा सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने “तेनझिंग नॉर्गे नॅशनल अ‍ॅडव्हेंचर अवॉर्ड”साठी नामांकने मागविली आहेत. या साहस क्षेत्रातील संबंधित व्यक्तीना हा पुरस्कार प्रदान केला जातो. साधारणपणे प्रत्येकाला लँड अ‍ॅट सी आणि एअर मधील साहसी कार्यांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. याव्यतिरिक्त, “लाइफ टाइम अचिव्हमेंट” साठी एक पुरस्कार देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्तींनी विहीत नमुन्यातील अर्ज क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातुन मिळवावे.

२०२० मध्ये साहस क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी केलेल्या इच्छुक उमेदवारांनी याशिवाय मागील दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसह बायोडेटा विहित नमुन्यातून  थोडक्यात लिहून सादर करावा. अपंग व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी आहे तेदेखील अर्ज करु शकतात.

या यशाचा तपशील फक्त दोन ते तीन पानांमध्ये हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पाठवावा. विपुल माहिती म्हणजे पेपर कटिंग्ज, पुस्तके इत्यादींचा समावेश करू नये. इच्छुक उमेदवारानी https: dbtygsyouth.gov.in) या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज  करावे.

अधिक माहितीसाठी www.dsya.goa.gov.in या क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.