राष्ट्रीय पातळीवर आयटीआय प्रशिक्षकांना पुरस्कार

0
424
गोवा खबर:भारत सरकारच्या, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे, १० सप्टेंबर २०२० रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून, नवी दिल्ली येथे डिजिटल कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे, केंद्रीय मंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
या राष्ट्रीय कार्यक्रमाला, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे, देशभरातील विविध आयटीआयमधील अभियांत्रिकी व गैर -अभियांत्रिकी ट्रेडमधील, उत्कृष्ट कौशल्य प्रशिक्षक/व्यावसायिक प्रशिक्षकांचा ‘कौशलाचार्य २०२०’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी श्री. विवेक परिसनाथ नाईक, प्रशिक्षक, काकोडा सरकारी आयटीआय, अभियांत्रिकी शाखा व श्रीमती सपना व्ही. पै आंगले, प्रशिक्षक, मडगाव सरकारी आयटीआय, गैर- अभियांत्रिकी शाखा, यांचा ‘कौशलाचार्य २०२०’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
श्री. विवेक परिसनाथ नाईक यांनी, अभियांत्रिकी शाखेमध्ये राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे व श्रीमती सपना व्ही. पै आंगले यांनी, गैर- अभियांत्रिकी शाखेमध्ये राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
  • गोवा सरकारच्या, कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालयाने, या दोन्ही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.