राष्ट्रीय उत्पादकता परिषदेकडून निवासी प्रशिक्षण

0
831

गोवा खबर:केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय उत्पादकता परिषदेकडून राज्यात निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारीसार्वजनिक उद्यमखासगी क्षेत्रातील उद्योजकसहकारी संस्थाआर्थिक संस्थाशैक्षणिक संस्थातंत्रशिक्षण संस्थाश्रमिकांसाठीच्या संघटना यांची क्षमता आणि कार्यक्षमता वृद्धींगत व्हावी यापद्धतीने सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नियोजन विभागाचे संचालक डॉ वाय दुर्गाप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक आणि राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे संचालक राजेश संद यांची उपस्थिती होती.

शासकीय किंवा खासगी कोणत्याही क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी किमान साधनांचा वापर करुन कमाल उत्पादकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे डॉ दुर्गाप्रसाद म्हणाले. प्रत्येक संस्थेसाठी योग्य त्या उपाययोजनांच्या माध्यमातून लक्ष्यप्राप्ती करणे आवश्यकत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण समन्वयक राजेश संद यांनी निवासी प्रशिक्षण शिबिरादरम्यानच्या विविध सत्रांची माहिती दिली. शुक्रवारी प्रशिक्षण शिबिराचा समारोप होणार आहे. प्रशिक्षण शिबिरात दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, इन्शूरन्स इन्स्टियूट ऑफ इंडिया, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.