राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात आलेल्या निधीचा उपयोग

0
103

गोवा खबर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरवात झाल्यापासून त्या अंतर्गत सन 2013-14 ते  2020-21 दरम्यान राज्य/केंद्रशासित प्रदेशांना दिलेली केंद्रीय मदत खालीलप्रमाणे आहेः

आर्थिक वर्ष 2013-14:  17,407.39 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2014-15:  18,288.50 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2015-16:  18,065.50 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2016-17:  18,424.43 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2017-18:  25,465.28 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2018-19:  24,998.81 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2019-20:  28,939.64 कोटी रुपये

आर्थिक वर्ष 2020-21:  29,455.72 कोटी रुपये

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) बळकट करण्यासाठी सरकारने आणखी निधीची तरतूद सुरूच ठेवली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2020-21 मधील 27,989 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद 2021-22 मध्ये वाढवून 31,100 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त, राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 मध्ये, राज्यांनी त्यांच्या आरोग्यावरील खर्च कमीत कमी 8% पर्यंत वाढवण्याची कल्पना केली आहे आणि या खर्चाच्या दोन तृतीयांश हा प्राथमिक आरोग्य सेवेसाठी असेल. याव्यतिरिक्त, एनएचएम अंतर्गत सामंजस्य करारानुसार, राज्यांना त्यांचा राज्य आरोग्य अर्थसंकल्प वार्षिक किमान 10% वाढवणे आवश्यक आहे.

राज्य सरकारे सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) स्थापित करतात. एनएचएम अंतर्गत राज्य / केंद्रशासित प्रदेशांना सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) स्थापित करण्यासह आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाते. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी (आरएचएस) 2019-20 नुसार, 31 मार्च, 2020 रोजी उत्तर प्रदेशसह राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय पीएचसी आणि सीएचसींची संख्या, परिशिष्टात दिली आहे.

परिशिष्ट

31 मार्च 2020 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) यांची संख्या

S. No. State/UT Primary Health Centres
(Rural + Urban)
Community Health Centres
(Rural + Urban)
 
 
1 Andhra Pradesh 1385 198  
2 Arunachal Pradesh 124 60  
3 Assam 1002 192  
4 Bihar 2027 64  
5 Chhattisgarh 837 174  
6 Goa 59 6  
7 Gujarat 1795 362  
8 Haryana 485 131  
9 Himachal Pradesh 588 92  
10 Jharkhand 351 177  
11 Karnataka 2534 208  
12 Kerala 932 227  
13 Madhya Pradesh 1476 330  
14 Maharashtra 2675 418  
15 Manipur 93 17  
16 Meghalaya 143 28  
17 Mizoram 65 9  
18 Nagaland 137 21  
19 Odisha 1377 384  
20 Punjab 527 155  
21 Rajasthan 2477 614  
22 Sikkim 25 2  
23 Tamil Nadu 1884 400  
24 Telangana 885 95  
25 Tripura 112 22  
26 Uttarakhand 295 68  
27 Uttar Pradesh 3473 723  
28 West Bengal 1369 348  
29 A&N Islands 27 4  
30 Chandigarh 48 2  
31 Dadra& Nagar Haveli and Daman &Diu 13 4  
32 Delhi 546 23  
33 Jammu &Kashmir 972 77  
34 Ladakh 32 7  
35 Lakshadweep 4 3  
36 Puducherry 39 4  
All India Total 30813 5649

 

टीपः

1. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर  2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती झाली.

2. जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन होऊन ऑगस्ट 2019 दरम्यान केंद्रशासित प्रदेश झाले.

3. दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव हे जानेवारी 2020 मध्ये एक केंद्रशासित प्रदेश म्हणून विलीन झाले.

4. स्रोत: ग्रामीण आरोग्य सांख्यिकी, 2019-20

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.