राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षीके

0
925
गोवाखबर: राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाचे औचित्य साधून पणजी येथील अग्निशमन दल प्रशिक्षण मैदानावरील प्रात्यक्षीके पाहुन उपस्थित थक्क झाले.गोवा अग्निशमन दलाकडे असलेल्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून आग कशी विझवली जाते याची प्रात्यक्षीके यावेळी जवानांनी दाखवली.
सुरूवातीला सेवा बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.त्यानंतर संचलन आणि प्रात्यक्षीके पार पडली.अग्निशमन बंब,मोटर सायकलवरील अग्निशमन जवान,रोबोट आदिंच्या माध्यमातून आग विझवण्याची प्रात्यक्षीके यावेळी दाखवण्यात आली.रोबोट अग्निशमन यंत्र सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता.अग्निशमन जवानांनी रंगीत पाण्याच्या फवाऱ्याने साकारलेला तिरंगा सगळ्यांच्या पसंतीस पडला. गॅस सिलिंडरला लागलेली आग विझवण्याच्या प्रात्यक्षीकात छोटी मुले आणि नागरीकांनी भाग घेतला.