राष्ट्रपती 7 आणि 8 जुलै रोजी गोवा दौऱ्यावर

0
1294

 

 

गोवा खबर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 आणि 8 जुलै रोजी गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच गोवा दौरा आहे.

7 जुलै रोजी राष्ट्रपती गोवा विद्यापीठाच्या 30 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. तसेच त्यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत.

8 जुलैला राष्ट्रपती बासिलीका ऑफ बॉम जिजस या जागतिक युनेस्को वारसा स्थळाला आणि मंगेशी मंदिराला भेट देतील.