राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांचे वितरण

0
1019
The President, Shri Ram Nath Kovind presenting the National Geoscience Awards 2017, at a function, in New Delhi on May 16, 2018. The Union Minister for Rural Development, Panchayati Raj and Mines, Shri Narendra Singh Tomar is also seen.

 गोवा खबर:राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान केले. आगामी काळात आपले सकल राष्ट्रीय उत्पादन वेगाने वाढणार असून,यामुळे खाण क्षेत्राचाही विकास होणार आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. गेल्या 4 वर्षात सरकारने खाण क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या असून, अनेक खाण क्षेत्रांचा शोध लावला आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यात भूवैज्ञानिक महत्वाची भूमिका पार पाडू शकतात, असे ते म्हणाले.