राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत सेवांवरील चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन

0
1170
The President, Shri Ram Nath Kovind at the launch of the 12 Champion Sectors in Services and inauguration of the Global Exhibition on Services-2018, at Mumbai, in Maharashtra on May 15, 2018. The Governor of Maharashtra, Shri C. Vidyasagar Rao, the Union Minister for Commerce & Industry and Civil Aviation, Shri Suresh Prabhakar Prabhu and the Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis are also seen.

गोवा खबर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मुंबईत सेवांवरील चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले आणि सेवांमधील 12 चॅम्पियन क्षेत्रांवरील पोर्टल सुरु केले.

यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी या जागतिक प्रदर्शनात सहभागी झालेल्या सुमारे 100 देशांमधील 500 प्रतिनिधींचे स्वागत केले. या उपक्रमाबद्दल त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघ आणि सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेची प्रशंसा केली. या उपक्रमामुळे भारतीय सेवा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक सेवा क्षेत्राबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 12 चॅम्पियन क्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्था तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान लाभेल आणि रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले.

सेवा क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आणि विस्तारणारा घटक आहे. रोजगार, मूल्यवर्धन, उत्पादकता आणि नवसंशोधन याबाबतीत सेवा क्षेत्राचे आज वर्चस्व आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे कृषी, पायाभूत विकास आणि उत्पादन क्षेत्रातही सेवा क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान आहे. सेवा क्षेत्र हे 21व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही असे ते म्हणाले.

भारतात, सकल मूल्यात सेवा क्षेत्राचे 61 टक्के योगदान आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. तरुणांची मोठी संख्या, अफाट प्रतिभा आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान यामुळे या क्षेत्रात भारताला नैसर्गिक लाभ असून, जगाला सेवा पुरवणारा मोठा देश बनण्यासाठी सज्ज आहे.

औद्योगिक युग आणि पारंपरिक निर्मिती अर्थव्यवस्थेने कारखान्यांमध्ये रोजगार निर्माण केले आणि पूरक उद्योगांच्या स्वरुपात उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले असे राष्ट्रपती म्हणाले. आज आपल्याला सेवा क्षेत्रात लहान परंतु उत्तम स्टार्ट अप्स हवे आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर स्थानिक सेवा कंपन्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत आहेत. भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट अप केंद्र आहे. ज्याने तरुण उद्योजकांच्या महत्वाकांक्षा पल्लवित केल्या आहेत.

तळागाळातील 12 कोटी उद्योगांना भांडवल पुरवणाऱ्या आणि बहुतांश सेवा क्षेत्रात उद्यमशीलतेच्या संस्कृतीचे बीज रोवणाऱ्या स्टार्ट अप इंडिया आणि मुद्रा योजनेचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला. आगामी काळात या स्टार्ट अप्सचे रुपांतर प्रचंड मोठ्या उद्योगांमध्ये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.