रायबंदर आणि पणजीत पावसामुळे झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत

0
876

पणजी:गेले 2 दिवस सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पानवेल-रायबंदर येथे दिवार फेरी जवळ आज कदंब महामंडळाच्या धावत्या बसवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये चालक जखमी झाला आहे.बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे पणजी फोंडा मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
पणजी शहरात देखील कैसिनो प्राईड 2 च्या प्रवेशद्वारा समोर झाड़ उन्मळून पड़ल्याने वाहतूक कोंडी झाली होती.अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड़ कापून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.