रायबंदरसह पणजीचा कायापालट करणार:मोन्सेरात

0
1369
गोवा खबर:रायबंदर हा पणजीचा भाग असून देखील नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे.निवडून येताच रायबंदरसह पणजीचा कायापालट करणार असे प्रतिपादन पणजीचे काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी केले.
पणजी पोटनिवडणुकीसाठीचे काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्या रायबंदर येथील दुसऱ्या कार्यालयाचे काल उद्धाटन करण्यात आले.

मोन्सेरात यांनी पहिले कार्यालय मळा भागात सुरु केले आहे.काल रायबंदर भागासाठी त्यांनी दूसरे कार्यालय सुरु केले.रायबंदर भागातील समस्या सोडवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे मोन्सेरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्धाटन सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर,विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,आमदार रवी नाईक, निळकंठ हळर्णकर,टोनी फर्नांडिस,महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हों, महापौर उदय मडकईकर यांच्यासह मोन्सेरात यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.