राम विलास पासवान कायम स्मरणात राहतील : केंद्रीय गृहमंत्री

0
92

गोवा खबर : दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पासवान यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आज भेट दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ज्येष्ठ केंद्रीय मंत्री राम विलास पासवानजी यांना श्रद्धांजली वाहिली. पासवानजी त्यांच्या मृदू स्वभाव आणि लोक कल्याणाशी संबंधित असलेल्या कामासाठी कायम स्मरणात राहतील. त्याच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो.”