राम मंदिर शिलान्यासानिमित्त कोविड संकटग्रस्तांना आर्थिक मदत करा : कामत

0
508
गोवा खबर :  अयोध्येतील भव्य  श्री राम मंदिराचा शिलान्यास सोहळा उद्या  ५ ॲागस्ट  रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या मंगल  समयी  मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी कोविड लाॅकडाऊन काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोमंतकीयांसाठी खास आर्थिक पॅकजची घोषणा करावी तसेच मागील कित्येक महिने सामाजीक सुरक्षा योजनांचा निधी न मिळालेल्या ज्येष्ठ नागरीक, विधवा, दिव्यांग, लाडली लक्ष्मी व ममता योजनेच्या लाभार्थ्यांना मागील कित्येक महिन्यांच्या थकबाकीसह निधी वितरीत करून गोरगरीबांच्या चेहऱ्यावर  हास्य फुलवावे,अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
कामत म्हणाले,सरकारची ही कृती संकट काळात गोरगरीब व वंचीताना मदत करावी या प्रभू श्रीरामांच्या शिकवणीचे पालन करणारी ठरणार आहे.
समस्त गोमंतकीयांनी सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी  व कोविड महामारीच्या संकटातुन सर्वांना लवकर मुक्ती मिळू दे म्हणुन प्रार्थना करावी. या संकट काळात आपण वायफळ खर्चाला आळा घालणे गरजेचे असुन, कोविडचे युद्ध जिंकल्यानंतर मोठ्या थाटात आपण उत्सव साजरा करण्याचे ध्येय ठेवुया,असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.