राफेलमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद वाढली:नाईक

0
1059
गोवा खबर:एयर फोर्स डेच्या दिवशी भारताला पहिले राफेल विमान मिळाले आहे.राफेलमुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली असून आता शत्रूला देखील विचार करावा लागणार,अशी प्रतिक्रिया केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली आहे.
राफेलचे पहिले विमान काल दसरा आणि एअर फोर्स डेच्या दिवशी भारताच्या ताब्यात मिळाले आहे.त्यावर प्रतिकिया व्यक्त करताना नाईक म्हणाले,चांगल्या मुहूर्तावर हवाई दलाच्या ताफ्यात पहिले चार्टर विमान दाखल झाले आहे.भारताची ताकद त्यामुळे निश्चित वाढली आहे.राफेल पेक्षा जास्त ताकदवान काही असूच शकत नाही.
राफेलचे उत्पादन जलद गतीने झाले तर वर्षाला एक ते दोन विमाने भारताला मिळू शकतील,असा विश्वास व्यक्त करून नाईक म्हणाले,राफेल भारताकडे आल्यामुळे शत्रूला सुद्धा त्याचा हजारदा विचार करावा लागणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल राफेलचा अनुभव घेतला आहे.संधी मिळेल तेव्हा आपण सुद्धा राफेलचा अनुभव घेणार असे नाईक म्हणाले.