राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
109

गोवा खबर : क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने वैयक्तिक तसेच स्वंयसेवी संस्था, महाविध्यालय, युवा क्लब आणि निमसरकारी संस्थांकडून ज्यांनी युवा विकास कार्यात प्रशंसनिय सेवा बजाविली आहे अशांकडून २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० च्या राज्य युवा पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

१५ ते २९ वयोगटातील युवक वैयक्तिक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पुरस्काराची अधिक माहिती क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्याच आली आहे. इच्छुकांनी ती डाऊनलोड करून घ्यावी. पूर्ण भरलेले अर्ज २० नोव्हेंबरपूर्वी dir-spor.goa@nic.in वर ईमेल करावे, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.