राज्य कृषी पुरस्कारासाठी नामांकने

0
125

गोवा खबर : कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या राज्यातील शेतक-यांसाठी कृषी रत्न, कृषि विभूषण आणि कृषिभूषण पुरस्कार देण्यात येतात. सदर पुरस्कारासाठी शेतक-यांकडून नामांकने मागविण्यात येत असून २ लाख रूपये व प्रशस्तीपत्र, १ लाख रूपये व प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रूपये व प्रशस्तीपत्र असे प्रत्येकी या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

सेंद्रिय शेती आणि पारंपारिक औषधी वनस्पती पुरस्कारांसाठी विहित नमुन्यांतील अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज संबंधित तालुक्यातील विभागिय कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून ते कार्यालयीन वेळेत मिळविता येतात.

पूर्ण भरलेले अर्ज विभागिय कार्यालयात सादर करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर अशी आहे.

कृषी खात्यातर्फे प्रत्येक वर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी व्यवसाय करणा-या शेतक-यांना राज्य पातळीवर उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देण्यात येतो.