राज्य कार्यकारी समितीचा कोविड-१९ च्या परिस्थितींवर आढावा

0
411

गोवा खबर:१० एप्रिल २०२० रोजी मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत, मुख्य सचिव, आयएएस श्री. परीमल राय तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रधान सचिव श्री आयएएस. पुनित गोयल, वाहतूक सचिव आयएएस श्री.एस.के. भंडारी, महसूल सचिव आयएएस श्री. संजय कुमार यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारी समितीची बैठक पार पडली.

यावेळी वित्त सचिव आयएएस श्री. दौलत हवालदार, डीआयजी आयपीएस     श्री. राजेश कुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) श्री सुभाष चंद्र, आरोग्य सचिव श्रीमती. निला मोहनन, अबकारी आयुक्त आयएएस                          श्री. अमित सतिजा, सचिव (मत्स्योद्योग) आयएएस श्री. पीएस रेड्डी, पर्यटन सचिव श्री. जे. अशोक, पंचायत सचिव श्री संजय ग्रीहर, विधी सचिव श्री सी.आर. गर्ग, नागरी पुरवठा सचिव श्रीमती. ईशा खोसला, नगरपालिका प्रशासकीय संचालक  श्री. तारीक थोमस, प्रधान मुख्य अभियंता श्री. यु.पी.पार्सेकर, आणि मुख्य अभियंता वीज) श्री. आर.जी. केणी उपस्थित होते.

आरोग्य सचिव श्रीमती. निला मोहनन यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-१९ ची एकही संशयित नमुन्याची चाचणी प्रलंबित नाही अशी माहिती दिली. तसेच ०३ एप्रिल २०२० नंतर कोविड-१९ चा एकही रुग्ण आढळला नाही. आजपर्यंत, कोविड-१९ चे गोव्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, एक रुग्णाचे आरोग्य सुधारले आहे आणि त्याला कोविड-१९ हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या क्वॉरंटाईन सुविधेमध्ये हलविण्यात आला आहे. गोव्यात अद्याप कोणत्याही समुदायाचा प्रसार झालेला नाही याची दक्षता एसईसीने नोंदविली आहे. श्रीमती. मोहनन यांनी पुढे सांगितले की, सीएसआर अंतर्गत थ्रोट स्वॅब कलेक्शनसाठी ई-फॅब्रिकेटेड रचनेचा प्रस्ताव राज्याला प्राप्त झाला आहे. अशीच एक रचना मडगावच्या हॉस्पिसीओमध्ये सुरु केली आणि अशाच पध्दतीच्या गोव्यातील इतर सरकारी हॉस्पिटलमध्येही सुरु करण्याचे नियोजित केले आहे. थ्रोट स्वॅब नमुने घेताना या सुविधेद्वारे आरोग्य सेवकास आवश्यक सुरक्षा दिली जाते. एसईसीने ही रचना विकत घेण्यासाठी खर्च जरी होत असला तरी ही रचना बसविण्यासाठीचा निर्णय घेतला.

एनआयव्हीला केलेल्या विनंतीनुसार आयसीएमआरसाठी लागणारे २००० रिजेंट कीट आणि २००० आरएनए एक्स्रेक्शन व्यतिरिक्त २०० आरएनए एक्स्रेक्शन कीट पुरविले आहेत आणि लवकरात लवकर अतिरिक्त आवश्यकता पुरविली जाईल असेही सांगितले आहे. गोमॅकॉने एसएआरआय संबंधित आजाराचीही चाचणी सुरु केली आहे. भारत सरकारने एसएआरआय रुग्णांच्या तपशीलवार चाचणीसाठी आणि आयएलआय चिन्हे दाखविणार्‍या रुग्णांच्या चाचणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.  भारत सरकारच्या वरील सूचनांचे पालन करण्यासाठी सर्वेक्षण डेटा वापरला जाईल. एसईसीने मास्क तयार करण्याच्या स्थितीचा आढावा घेतला. सचिव यांनी माहिती दिली की त्यांनी सद्या मास्क उत्पादन करणार्‍या सहा एजन्सीच्या (हस्तकला व इतर बचत गटासहित) क्षमतेचे मी मूल्यांकन केले आहे अशी माहिती डब्ल्यूसीडीच्या सचिवांनी दिली. त्यांची सद्याची क्षमता प्रति दिन सुमारे २०,००० मास्क आणि प्रति मास्क रु.२५ रुपये अशी किंमत जे परत वापरले जाऊ शकते (धुतले जाऊ शकते). मास्कसाठी त्यांना कापड आणि धागे त्यांना पुरविले पाहिजेत.

१९१ पंचायतींपैकी १७२ पंचायतींनी पावसाळ्या पूर्वीचे कामे सुरु केली आहेत अशी माहिती पंचायत संचालकांनी दिली. तसेच ही कामे १४ नगरपालिकांमध्येही सुरु झाली आहेत. एसईसीने नमूद केले की पावसाळा हाताळण्यासाठी राज्याने सज्ज असणे आवश्यक आहे.

 उपलब्ध असलेल्या १९ कापणी करणार्‍यांपैकी आठ कापणी करणार्‍यांनी राज्यात आपली कामे सुरु केली आहेत अशी माहिती शेती सचिवांनी दिली. ते म्हणाले की, नुकताच कापणी झालेल्या पिकांच्या खरेदीसाठी विपणन फेडरेशनशी मी बैठक घेतली आहे. लॉकडाऊन परिस्थिती लक्षात घेता शेतकर्‍यांकडून उत्पादनात कुशल खरेदी न होण्याच्या शक्यतेअभावी मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आणि कृषी विभागाला सांगितले की या खरेदीला आवश्यक तो पाठिंबा देण्यात यावा.

गोव्यात ये-जा करण्यासाठी लोकं मालवाहू गांड्याचा वापर करू शकतात म्हणून माल तपासणीसाठी आवश्यक दिशानिर्देश त्यांनी जारी केली आहेत अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालल्याची माहिती नागरी पुरवठा सचिवांनी दिली आहे. प्रसार माध्यमांच्या बातम्यांनुसार काही छोट्या किराणा दुकानांवर सामानाची टंचाई दिसून आली त्यासंबंधी प्रत्येक्षात जेव्हा चौकशी केली तेव्हा असे दिसून आले आहे की राज्यात या वस्तूंच्या उपलब्धतेऐवजी वितरकांना पैसे न दिल्याचे कारण पुढे आले. तथापि, एसईसीने नमूद केले की माध्यमांद्वारे प्राप्त अहवालाचे निराकरण करण्यासाठी सत्यापन करणे आवश्यक आहे. सचिवांनी अशीही माहिती दिली की पीठाची कमतरता फक्त ब्रेंडेड आट्याच्या लहान पॅक पुरतीच मर्यादित आहे. यासंबंधी तोडगा काढण्यासाठी त्यांनी भागधारकांकडे बैठकां घेतल्या आहेत.

सर्व कॅम्प्स सुरळीत सुरू आहेत आणि आरोग्याशी संबंधित कोणत्याही विषयावर वेळीच उपस्थित राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी केली जाते. क्वॉरंटाईन सुविधेच्या नोडल ऑफिसरने अशी माहिती दिली की, त्यांनी दोनही क्वॉरंटाईन  सुविधांना भेट दिली असून सध्या मडगाव रेसिडेन्सीमध्ये ५ आणि ओल्ड गोवा रेसिडेन्सीमध्ये ३ रुग्ण आहेत. सर्व रुग्णांचे आरोग्य चांगले आहे. एका रुग्णाला कांदोळी रेसिडेन्सीमध्ये ठेवले आहे. विदेशींसाठी नोडल अधिकार्‍यांनी एसईसीला असे सांगितले की, आजपर्यंत एकूण ३६१४ विदेशी लोकं २० विमानातून गेले आहेत. त्यांनी असेही सांगितले की राज्याने ३५ देशातील नागरिकांना परत पाठविण्याची सुविधा केली आहे. त्यांना विदेशी मिशन व दूतावासांकडून धन्यवादाचे संदेशही आले आहेत.

सर्व जिल्हा निरीक्षकांनी सांगितले की, क्षेत्रात आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालला आहे. त्यांना सर्व दुकान मालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडे आवश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्याची माहिती काढली. एसईसीने त्यांना ग्रामीण भागात नियमीतपणे जाण्यास सांगितले.

पोलिस अधिकार्‍यांनी माहिती दिली की, विविध पोलिस स्टेशनचे कर्मचारी नोंदणीकृत असणार्‍या 700 ज्येष्ठ नागरिकांशी त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासासाठी संपर्कात आहेत. क्षेत्र अधिकारी मुख्यालय पातळीवर देखरेखीसाठी ज्येष्ठ नागरिकांबरोबर असलेली छायाचित्रे पाठवत आहेत. प्रधान मुख्य अभियंता (पीडब्ल्यूडी) यांनी सांगितले की पूर्वीच्या निर्देशानुसार विविध राज्य सीमेवरील देखरेखीच्या पदांसाठी तंबू उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याची रचना रविवारपर्यंत तयार होईल. प्रधान मुख्य अभियंता (पीडब्ल्यूडी) यांनी सांगितले की, पाणी पुरवठा सुरळीत चालला आहे. मोठ्या हायड्रोलीक पंपचे काम लवकरच संपणार आहे.

समितीने सर्व संबंधितांना दिलेल्या माहितीनुसार एमएचए आदेशानुसार, वरील नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर किंवा दिशानिर्देशांचे पालन न करणार्‍यांना कोणत्याही व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम 51 ते 60 नुसार तसेच आयपीसीच्या कायदेशीर क्रिया u/s 188 तरतुदींनुसार कार्यवाही केली जाईल.