राज्ये / केन्द्रशासित प्रदेशांना 23 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा उपलब्ध

0
87

गोवा खबर : देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. यासोबतच राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना लसींची थेट खरेदी करण्याची सुविधाही केंद्र सरकारने दिली आहे. चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड प्रतिबंधक वर्तन यासह लसीकरण हा देखील सरकारच्या महामारी विरोधातल्या लढ्यातील धोरणाचा अविभाज्य घटक आहे.

कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाला 1 मे 2021 पासून सुरुवात झाली आहे.

नियोजितधोरणानुसार, प्रत्येक महिन्यात कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषधी प्रयोगशाळेने  (सीडीएल) मान्यता दिलेल्या एकूण लसींच्या मात्रांपैकी  50% मात्रा केंद्र  सरकार खरेदी करेल आणि पूर्वीप्रमाणे  या लसींच्या मात्रा राज्य सरकारांना  पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करुन देईल..

आधी ठरल्याप्रमाणे या मात्रा राज्य सरकारांना मोफत उपलब्ध केल्या जात राहतील. मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 23 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (23,18,36,510) राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत. अपव्ययासह एकूण 21,51,48,659 मात्रा देण्यात आल्या आहेत.(आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार).

राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांकडे अजूनही 1.57  कोटींपेक्षा जास्त (1,57,74,331) लसींच्या मात्रांचा साठा उपलब्ध आहे.