राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 27.28 कोटींहून अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा

0
201

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप लसींच्या 1.82 कोटी मात्रांचा साठा शिल्लक

गोवा खबर:देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून, केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींचा मोफत पुरवठा करत आहे. त्याशिवाय, लसींची थेट खरेदी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार सुविधाही उपलब्ध करुन देत आहे. , केंद्र सरकारच्या कोविड महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणात, चाचण्या, संभाव्य रुग्णांचा मागोवा, उपचार आणि कोविड नियमांचे पालन यासह, व्यापक लसीकरण हा ही एक महत्वपूर्ण उपाय आहे.

कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात, मुक्त आणि गतिमान लसीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी एक मे 2021 पासून सुरु झाली आहे.

या धोरणाअंतर्गत, दर महिन्याला, कोणत्याही लस उत्पादकाकडून एकूण उत्पादित आणि केंद्रीय औषध प्रयोगशाळेने मंजुरी दिलेल्या लसींपैकी 50 टक्के लसी,केंद्र  सरकार खरेदी करत आहे. या लसींची खरेदी पुढेही सुरु राहणार असून, पूर्वीप्रमाणेच या लसींचा मोफत पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केला जाणार आहे.

आतापर्यंत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 27.28 कोटींहून अधिक  (27,28,31,900) लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून (मोफत लस पुरवठा) तसेच राज्यांना थेट खरेदी सुविधेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

यापैकी, राज्यांनी एकूण 25,45,45,692 लसींच्या मात्रांचा वापर (वाया गेलेल्या मात्रांसह) केला आहे. ही आकडेवारी आज सकाळी आठ वाजताच्या प्राथमिक आकड्यांवर आधारित आहे.

1.82 कोटींहून अधिक  (1,82,86,208) लसींच्या मात्रा अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असून त्या देण्याचे काम सुरु आहे.