राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.33 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध

0
83

गोवा खबर : देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. चाचणी, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन यासह लसीकरण हा सुद्धा महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणाचा अविभाज्य भाग  आहे.

कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाला 1 मे  2021पासून सुरुवात झाली.

या धोरणानुसार, दरमहा, कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मंजूर केलेल्या 50 टक्के लसीच्या मात्रा भारत सरकार खरेदी करेल. आधीप्रमाणेच राज्य सरकारांना या मात्रा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.

केंद्र सरकारकडून मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 25 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (25,06,41,440) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.

आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार,

वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 23,74,21,808  मात्रा देण्यात आल्या आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.33 कोटींपेक्षा जास्त (1,33,68,727) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.

याशिवाय येत्या 3 दिवसात 3 लाखापेक्षा अधिक (3,81,750) लसीच्या मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना प्राप्त होतील.