राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 18,016 ऑक्सीजन काँसंट्रेटर्स, 19,085 ऑक्सीजन सिलिंडर्स, 19 ऑक्सीजन निर्मिती संयंत्र, 15,206 व्हेन्टिलेटर्स/ बायपॅप, रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या 7.7 लाख कुप्या, फावीपिरावीर औषधाच्या 12 लाख गोळ्या त्वरेने रवाना

0
63

गोवा खबर : भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 वैद्यकीय मदत सामग्री पुरवठा आणि उपकरणे यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य विविध देशांकडून/संस्थांकडून प्राप्त होत आहे. ही मदत सामग्री राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरेने वितरीत/रवाना करण्यात येत आहेत.

27 एप्रिल 2021 पासून 26 मे, 2021. पर्यंत रस्ते आणि हवाई मार्गाद्वारे एकूण, 18,016 ऑक्सीजन काँसंट्रेटर्स, 19,085 ऑक्सीजन सिलिंडर्स, 19 ऑक्सीजन निर्मिती संयंत्र, 15,206 व्हेन्टिलेटर्स/ बायपॅप, रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या 7.7 लाख कुप्या, फावीपिरावीर औषधाच्या 12 लाख गोळ्या वितरीत/रवाना करण्यात आल्या आहेत.

26/27 मे, 2021 रोजी कॅनडा, जर्मनी, बहारीन (भारतीय आणि बहारीन  संस्था), रॉबर्ट बॉश (जर्मनी) यांच्याकडून मुख्य वस्तू प्राप्त झाल्या.

Consignments Quantity
Oxygen Concentrators 10
Ventilators/Bi-PAP/CPAP 692

या सामग्रीचे राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि  संस्थांना प्रभावी त्वरित वाटप आणि सुव्यवस्थित वितरण अविरत सुरूच आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियमितपणे यावर व्यापक देखरेख ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात प्राप्त परदेशी कोविड मदत सामग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष 26 एप्रिल, 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने  2 मे, 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार केली आणि अंमलात आणली.