राज्याबाहेर जाण्यासाठी निर्गमन परवान्याची आवश्यकता नाही

0
405

गोवा खबर:राज्यातून बाहेर जाण्यासाठी गोवा सरकारच्या ‘निर्गमन परवान्या’ची (एक्झिट परमिट) आवश्यकता नाही, असे उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी आज जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. गोव्याबाहेर जाऊ इच्छिणार्‍या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी संबंधित ईच्छित ठिकाणच्या जिल्ह्याकडून/राज्याकडून लागू असल्याप्रमाणे परवानगी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.