राज्यात उद्या परवाअतिवृष्टी

0
993
आपत्ती व्यवस्थापन सज्ज , वार्‍याची गती-लाटांची उंची वाढणार
 गोवा खबर: गोव्यात उद्या आणि  परवा जु अतिवृष्टीचा  इशारा हवामानखात्याने दिला आहे. या काळात समुद्री भागात वार्‍याची गतीतसेच लाटांची उंचीही वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला अतिदक्ष राहण्याची सूचना हवामानविभागाने दिली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.शुक्रवारी  व शनिवारी  पाऊस थैमान घालणार असल्याने प्रशासनाने आपत्तीव्यवस्थापन सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जोरदार पावसात जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन करताना नागरिकांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
समुद्रात ६० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहणारअसून लाटांची उंची ३ ते ३.५ मीटर पर्यंत वाढणार आहेत. हा इशारा गोव्याबरोबर दक्षिण महाराष्ट्रालाही देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात पेडणे व वाळपईत पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पावसाच्या इंचाचे अर्धशतक पूर्ण होईल.