राज्यातील मंत्री आपले एका महिन्याचे वेतन कोविड -19 निधीसाठी देणार

0
298
गोवा खबर: मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी आपले एका महिन्याचे वेतन कोविड-19 निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच  झालेल्या विशेष कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आयएएस, आयएफएस, आयपीएस अधिकारी सुद्धा स्वेच्छेने रू. 10,000/-     कोविड-19 निधीसाठी देतील. तसेच अधिकारी, सीएसआर उपक्रम इ. द्वारेही या निधीसाठी स्वेच्छा योगदान दिले जाईल.