राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी विनोदी सिनेमा निर्मितीवर भर देऊन लोकांना तणावातून मुक्त करावे:नाईक

0
1135

गोवा खबर:” केस्तांव दी कोफुसांव” या कोंकणी चित्रपटाच्या प्रोमो लोकार्पण सोहळा  फर्मागुडी -फोंडा येथील पीईएस शिक्षणीक संस्थेत माजी मुख्यमंत्री आणि फोंडाचे आमदार रवी नाईक यांच्या हस्ते पार पडला.राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी विनोदी सिनेमा निर्मितीवर भर द्यावा आणि लोकांना तणावातून मुक्त करावे असे आवाहन नाईक यांनी यावेळी केले.
यावेळी पीईएस संस्थेचे कोषाध्यक्ष आर जी देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य विकास पिसुर्लेकर, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विश्वास रायकर, सिनेमाची निर्माती सुचिता  नार्वेकर, सह-निर्माते आनंद पंचवाडकर, अभिनेते राजदीप नाईक, अवधूत कामत, गौरी कामत, स्पिरिट फेर्नांडीस आणि  संगीतकार रोहन नाईक उपस्थित होते.
” केस्तांव दी कोफुसांव” हा  चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वप्नील शेटकर  यांनी दिग्दर्शित केलेला हा कोंकणी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकां पर्यंत पोहचवण्याचे चित्रपटाच्या पथकाने ठरवले आहे.
 नाईक यांनी  चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे  अभिनंदन केले. “कोकणी चित्रपट निर्मात्यांनी विनोदी  चित्रपट निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. विनोदी चित्रपटातून लोकांचा तणाव दुर होतो.” असे त्यांनी म्हटले.

अशा दर्जेदार चित्रपटाच्या निर्मितीसाठी  अभिमान वाटतो. “गोव्यामधील चित्रपट उद्योग भरभराट होण्याच्या मार्गावर आहे. आम्हाला यासाठी सगळ्यांचा  पाठिंबा हवा आहे.” असे आवाहन निर्मात्या सुचित नार्वेकर यांनी केले.

गौरी कामत यांनी युवकांना या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले. “आपण सर्वांनी  गोव्यातील चित्रपट क्षेत्राला  पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
राजदीप नाईक, अवधुत कामत आणि रोहन नाईक यांनी यावेळी आपले अनुभव व्यक्त केले आणि चित्रपटाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.