राज्यातील कोविडच्या वाढत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘5 -T’ रणनीती लागू करण्याचे आवाहन

0
120
गोवा खबर : आम आदमी पक्षाने सावंत सरकारवर कोविड संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. दररोज वाढत चाललेल्या सरकारच्या गोंधळात शूरपणे कार्यरत असलेल्या कोरोना योध्यांकडे अर्थात कामगारांकडे देखील दुर्लक्ष केलेले आहे.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात आप गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी लिहिले आहे की,  16 एप्रिल रोजी एका दिवसात सर्वाधिक कोविड रुग्ण सापडल्याची  नोंद झाली आहे, तेव्हा १००० प्रकरणे नोंदविली गेली आहेत. आणि गोव्याचे कोविड बाधेचा दर 28 टक्के असून देशात सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
पुरेसा वेळ असूनही सरकार अतिरिक्त कोविड सुविधेची व्यवस्था करण्यात अपयशी ठरले आहे म्हणून रुग्णालयात आयसीयू सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अतिरिक्त सुविधा त्वरित तयार करण्याची मागणी केली.
तसेच राहुल यांनी निदर्शनास आणून दिले की “आप ची ‘5 – T’ रणनीती म्हणजेच  Testing(चाचणी), ट्रेसिंग, ट्रॅकिंग, (Treatment) उपचार आणि कोविड विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण टीम ने एकजुटीने कार्य करणे हे आहे परंतु सावंत सरकार कोरोना चाचणी सुविधा वाढविण्यात आणि कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
 यापूर्वी  गोव्यातील सरकारने “भिऊपाची गरज ना” अशी भूमिका घेत लसीकरणाच्या नावाखाली सुरू गेलेल्या नवीन “भाजप उत्सव” ची खिल्लीही उडविली आणि म्हणाले की, स्वतःच्या निवडणूक प्रचारासाठी करदात्यांच्या पैशांतून चाललेली लसीकरणाची मोहीम पूर्णपणे निंदनीय आहे.
 “लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून  स्वयंसेवी संस्था, ग्राम समित्या आणि अगदी धार्मिक संस्थांसह प्रत्येकास सामील करावे” असे निर्देशित करताना ते म्हणाले की, प्रत्येक गोयंकारचे जीवन बहुमूल्य आहे म्हणून त्याया आपण हलक्यात नाही घेऊ शकत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच तात्काळ प्राधान्याने आप ने सुचविलेल्या ‘5 T ‘ रणनीतीची अंमलबजावणी करण्याची विनंती केली.
तसेच राहुल यांनी सरकारच्या उद्योजकांना उद्युक्त करण्याच्या उत्सुकतेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मनोरंजन व खेळाच्या ठिकाणी बंदी नसल्याचे निदर्शनास आणून येथे गर्दी जमा होऊ नये म्हणून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
लसीकरणाची वयोमर्यादा 18 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी गोव्यासाठी लसींचा अतिरिक्त साठा करण्याची मागणी केली आणि गोयंकरांना घरपोच जाऊन लसीकरण करण्याच्या मोहीमेला सुरू करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी पर्यटन उद्योगास विश्वासात घेऊन गोव्यातील पर्यटकांच्या प्रवेशावरील योग्य बंधने घालण्याची सूचना केली आणि गोवामध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी किमान कोविड बाधा नसल्याचे प्रमाणपत्राचे धोरणही घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
गोव्यात सरकारने पुढाकार घेऊन “टीका उत्सव” यासह सर्व शक्य त्या साधनांचा वापर करून गोयंकरांचे जास्तीत जास्त लसीकरण करुन इतरांसाठी उदाहरण प्रस्तुत करावे अशी सूचना राहुल यांनी केली.