राज्यस्थापनादिनी भाजपने केलेल्या घोषणा शेवटी जुमलाच ठरल्या : आप

0
100
गोवा खबर : गोव्यातील जनतेला पोकळ घोषणांनी मूर्ख बनवल्याबद्दल आम आदमी पक्षाने भाजप सरकारला फटकार लगावली आहे.  राज्यस्थापणा दिवस झाल्यापासून दोन आठवडे उलटून गेले आहेत हे लक्षात आणत प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी  घोषित केलेल्या योजनांची अधिसूचिना केव्हा निघेल, याची तारीख घोषित करण्याची मागणी केली.
“ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनात गमावले त्यांच्यासोबत भावनिक  राजकारण  करून त्यांना मुख्यमंत्री सावंत यांनी गोंधळात टाकू नये  किंवा आपल्या राजकारणासाठी साथीच्या रोगाचा वापर  करु नये.  घोषित केलेल्या योजनेसाठी कोण पात्र आहे?  उत्पन्नाची मर्यादा किती आहे?  कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत?  शोकग्रस्त कुटुंबाने कोठे अर्ज करावा?  दोन आठवड्यांनंतर देखील यापैकी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ” असे नाईक म्हणाले.
नाईक म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा कमाई करणारा सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करण्यास खरोखर रस असेल तर मदत करण्याची वेळ आता आली आहे.  अशी कुटुंबे शालेय फी भरण्यासाठी, विजेची बिले भरण्यासाठी किंवा अन्नासाठी संघर्ष करीत आहेत, असे सांगून नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे शब्द कधी प्रत्यक्षात येतील काय हे जाणून घेण्याची मागणी केली.
“सावंत यांचा बनावट घोषणांचा इतिहास आहे, खासकरुन आर्थिक योजनांशी संबंधित.  वर्षभरापेक्षा अधिक काळातील आरोग्य कामगारांसाठी 20% वेतन वाढ आणि 50 लाख विमा संरक्षण देण्याची त्यांची भव्य घोषणा आम्हाला आठवते.  आजवर किती कोरोना योद्ध्यांना हे फायदे देण्यात आले आहेत हे ते सांगू शकतील काय?  एवढे खोटे बोलल्याबद्दल सावंत यांना स्वत: चीच लाज वाटली पाहिजे “, असे नाईक म्हणाले.
डीवायएसएस आणि गृह आधार यासारख्या विद्यमान योजनांमधील पैसा महिना होऊन गेला मात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही, असे सांगून नाईक म्हणाले की, जनतेला आश्वासने देताना भाजपा सरकार व सावंत यांची सर्व विश्वासार्हता गमावली आहे.