राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित

0
497

 

 

 गोवा खबर:राज्यसभेतल्या 55 खासदारांच्या जागा एप्रिल 2020 मध्ये रिक्त होत असून त्यासाठी देशातल्या 17 राज्यातून सदस्य निवडले जाणार आहेत. त्याबद्दलचा तपशील

अ.क्र. राज्य रिक्त जागा निवृत्तीची तारीख
महाराष्ट्र 7 02.04.2020

 

ओदिशा 4
तामिळनाडू 6
प. बंगाल 5
आंध्र प्रदेश 4 09.04.2020

 

तेलंगणा 2
आसाम 3
बिहार 5
छत्तीसगड 2
गुजरात 4
हरयाणा 2
हिमाचल प्रदेश 1
झारखंड 2
मध्य प्रदेश 3
मणिपूर 1
राजस्थान 3
मेघालय 1 12.04.2020

 

 

 

 

निवडणूक आयोगाने या सर्व राज्यांना निवडणूक घेण्याचा कार्यक्रम आखून दिला आहे.

 

अ.क्र. कार्यक्रम तारीख
1. अधिसूचना जारी 06 मार्च 2020 (शुक्रवार)
2. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 13 मार्च 2020 (शुक्रवार)
3. उमेदवारांच्या अर्जांची छाननी 16 मार्च 2020 (सोमवार)
4. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 18 मार्च 2020 (बुधवार)
  निवडणूक तारीख 26 मार्च 2020 (गुरूवार)
  निवडणूकीची वेळ सकाळी 9.00 वा. ते दुपारी 4.00 वा.
  मतमोजणी 26 मार्च 2020 (गुरुवार) 5.00 वा.
  निवडणूक समाप्त होण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2020 सोमवार

 

 

 

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निवडक अधिकाऱ्यांकडे दिलेल्या विशिष्ट अशा जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचाच वापर मतपत्रिकेवर करायचा असून इतर कोणत्याही पेनचा वापर मतदानासाठी करता येणार नाही अशी सूचना आयोगाने केली आहे.

निवडणूक खुल्या आणि प्रामाणिक वातावरणात होण्यासाठी दक्ष निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीही केली आहे.