राज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ राहणारच!

0
1056

राज्यसभा निवडणुकीत मतदारांना ‘नोटा’चा पर्याय देऊ नका, अशी मागणी करणारी काँग्रेसची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं आमदारांना ‘नोटा’चा पर्याय वापरता येणार असून मतफुटीच्या भीतीनं ग्रासलेल्या काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत.

गुजरात विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या तीन जागांसाठी येत्या ८ ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ‘नोटा’ पर्यायाचा वापर होणार आहे. काँग्रेसनं यास आक्षेप घेतला आहे. घटनेत सुधारणा केल्याशिवाय निवडणूक आयोग ‘नोटा’च्या पर्यायाचा वापर करू शकत नाही. अन्यथा ती घटनेची पायमल्ली ठरेल. ‘नोटा’ पर्याय दिला गेल्यास घोडेबाजाराला ऊत येईल. सत्ताधारी पक्ष विरोधी आमदारांची मतं विकत घेतील, असा दावा काँग्रेसनं केला होता. न्यायालयानं तो अमान्य केला.