राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची गोवा क्रांतीदिनी हुतात्म्यांना आदरांजली

0
299

 

गोवा खबर:राज्यपाल श्री सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी राज्याच्यावतीने आजाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून गोवा क्रंतीदिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

      मुख्य सचिव  परिमल राय, आयएएस, जिल्हाधिकारी  आर मेनका, आयएएस, राज्यपालांचे सचिव  रूपेश कुमार ठाकूर, आयएएस, महसूल आणि माहिती खात्याचे सचिव  संजय कुमार, आयएएस, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग, आयपीएस, माहिती खात्याच्या संचालिका  मेघना शेटगांवकर, पणजीचे महापौर  उदय मडकईकर यावेळी उपस्थित होते.

         

  स्वातंत्र्य सेनानी डॉ राम मनोहर लोहिया यांनी १८ जून रोजी परकीय जोखडाविरूध्द लढा देण्यासाठी आणि पोर्तुगीज जोखडातून गोव्याला मुक्त करण्यासाठी गोव्यातील लोकाना एकत्र येण्याची हाक दिली होती याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी गोवा क्रांती दिवस पाळण्यात येतो. या हाकेने गोव्यातील अनेक लोक प्रेरित झाले आणि शेवटी १९ डिसेंबर १९६१ साली गोवा मुक्त झाला. गोव्यातील स्वातंत्र्य चळवळीतील ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सौनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो.