राज्यपाल पदाची शपथ घेण्यासाठी आर्लेकर हिमाचल प्रदेशला रवाना

0
151

मुख्यमंत्री, गोवा भाजपकडून आर्लेकर यांना शुभेच्छा

 

गोवा खबर:हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले राजेंद्र आर्लेकर आज दुपारी शिमला येथे जाण्यास निघण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भाजप पक्ष संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आर्लेकर यांच्या वास्को येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाल व श्रीफळ भेट देत त्यांना सन्मानित करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनी आर्लेकर यांना पुष्पगुच्छ प्रदान केला. यावेळी आर्लेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, खजिनदार संजीव देसाई, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा आदी उपस्थित होते.

आर्लेकर दुपारी चंडीगढ येथे विमानाने रवाना झाले आहेत. तेथून हेलिकॉप्टरने ते शिमला येथे जाण्यास निघतील.