राज्यपालाकडून गोवा घटक राज्य दिनाच्या शूभेच्छा

0
89

गोवा खबर : गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोव्यातील लोकांना गोवा घटक राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपाल आपल्या संदेशात म्हणतात, 34 वर्षांपूर्वी 30 मे रोजी गोव्याचे केंद्र शासित प्रदेशातून भारतीय संघराज्यात रूपांतर झाले. 1967 मध्ये जनमत कौलापासून सुरू झालेल्या दीर्घकाळाच्या आणि कठीण प्रयत्नातून गोव्याला स्वतंत्र आणि वेगळे अस्तित्त्व मिळाले.  या आनंददायी प्रसंगी, आपण गोव्याला  घटक राज्याचा दर्जा मिळविण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व नेते, विचारवंत आणि गोव्यातील लोकांचे कृतज्ञतेने स्मरण करूया. राज्याच्या राजकीय इतिहासात घटक राज्याचा दर्जा महत्वाचा आहे.

गोवा राज्य लोकांच्या सामाजिक-आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे काम करीत आहे. गोव्याला देशातील सर्वात विकसित राज्यांमध्ये गणले जाते याचा आपण सर्वाना अभिमान आहे. देशात गोव्याचे दरडोई उत्पन्न अधीक आहे ही अभिमानाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या असून रस्ते, रेल्वे, विमानतळ व पुलांच्या स्वरुपात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन राज्याच्या विकासासाठी शासनाने जोमाने काम केले आहे.

19 डिसेंबर 2020 रोजी गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्ष दिन सोहळ्याचे उद्घाटन करतांना भारताच्या राष्ट्रपतींनी गोव्यात लागू अलेल्या समान नागरी कायद्याचे कौतुक करून ते अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. यावर्षी मार्चमध्ये, माझ्या सरकारने पर्वरी येथे प्रतिष्ठित नवीन उच्च न्यायालय संकुलाचे काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन केले आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत आवाहनाच्या अनुषंगाने माझ्या सरकारने २०२० मध्ये “स्वयंपूर्ण गोंय” मोहिम सुरू केली आहे. या मिशन अंतर्गत, सरकार आणि जनतेमधील दरी कमी करणे आणि सरकारी योजना लोकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सरकारी कर्मचार्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्त केले गेले आहे.

गेल्या काही वर्षांत झालेल्या गोव्यातील प्रगती व समृद्धीचे श्रेय राज्यात शांतता व सौहार्दाच्या वातावरणाला जात आहे. गोव्यातील लोक त्यांच्या आदरातिथ्य आणि सामाजिक मैत्रीसाठी परिचित आहेत. गोवा जगभरातील असंख्य पर्यटकांना आकर्षित करणारे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध वनस्पती आणि जीवसृष्टी आणि चैतन्यमय संस्कृती यासाठी प्रसिध्द आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने नवीन पर्यटन धोरण- 2020 चे सूरू केले आहे. त्याशिवाय समुद्रकिनार्‍यावरील पर्यटनाचे प्रमुख वैशिष्ट्य असलेली एक नवीन टुरिझम शॅक पॉलिसी तयार केली गेली आहे.

राज्यपाल पुढे म्हणतात, की मार्च २०२० पासून देशात कोविड -19 संसर्ग सर्व देशभर पसरला आहे. यामुळे देशाची सामाजिक-आर्थिक प्रगती विस्कळीत झाली आहे. लोकांना या साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी माझ्या सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. पर्यटन खुले केले आहे. तथापि, मार्च 2021 मध्ये विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाल्याने वाढते संक्रमण आणि मृत्यूंच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला नवीन आणि गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.  महामारीमुळे अनेकांचा बळी गेला आहे. तथापि, समाधानाची गोष्ट म्हणजे आमच्या कोरोना वॉरियर्स, विशेषत: डॉक्टर, परिचारिका, फ्रंटलायन वर्कर्स आणि इतरांच्या अथक आणि समर्पित सेवेमुळे बरेच लोकांचे प्राण वाचले आहेत. सरकारने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार, पुरेशी उपकरणे, अतिरिक्त कर्मचार्री वर्ग आवश्यक औषधे उपलब्ध करून तसेच टीका उत्सवद्वारे लोकांचे लसीकरण करून या संकटाच्या काळात योग्य व्यवस्थापनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

राज्यपाल म्हणतात, कोरोनाला पराभूत करायचे असल्यास आमचा प्रत्येकाचा सहभाग आनी येगदान आवश्यक आहे. मास्क घालून, सामाजिक अंतरांचे पालन करून आणि स्वच्छता राखून लोकांनी सुरक्षा उपायांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. महामारी  कमी झाली की अर्थव्यवस्था, विशेषत: पर्यटन आणि खाण क्षेत्रातील वव्यवसाय सूरू करण्यास सरकार उत्सुक आहे.  आपण सर्व आव्हानांवर मात करुन प्रगती व विकासाच्या दिशेने आपली वाटचाल पुढे चालू ठेवू.

गोव्याच्या घटक राज्य दिनानिमित्त मी माझ्या सर्व बंधू- भगिनीना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सुवर्ण गोव्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सर्वाऩी मनापासून काम करण्यास वचनबध्द होऊया, असे राज्यपाल म्हणतात.