राज्यपालांहस्ते राज भवनात उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार

0
708

गोवा खबर:राज्यपाल  सत्यपाल मलिक यांच्याहस्ते राज भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात २०१९- २० मधील ६५ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा २०१९- २० मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या उत्कृष्ठ खेळाडूंचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

      ६५ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा २०१९- २० मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या उत्कृष्ठ खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन आणि उत्कृष्ठता गाठण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्यपालानी राजभवनात सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

      ६५ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा २०१९- २० मध्ये गोव्याचे नेतृत्व करण्यासाठी क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याने विविध खेळातील सुमारे ९० संघांची नियुक्ती केली होती. या विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुनी ८ सुवर्ण, ११ रौप्य आणि ३१ ब्रॉंझ पदके प्राप्त करून राज्याला किर्ती मिळवून दिली.

      मोठे यश गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे सांगून राज्यपालांनी पदक विजेत्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. खेळाडूंशी चर्चा करताना राज्यपालानी आपल्या जम्मू आणि काष्मीर राज्यपालपदाच्या काळात  सरकारने योग्य सुविधा, प्रशिक्षण आणि सरकारी मदत उपलब्ध केल्याने जम्मू आणि काष्मीरच्या खेळाडूनी खेळात यश गाठल्याचे सांगितले

      पूर्वीच्या काळात खेळांच्या तुलनेत शिक्षणाला अधिक महत्व देण्यात येत होते परंतु आज परिस्थितीत बदल झाला आहे. आजचे खेळाडू खेळाकडे करियर म्हणून बघतात त्यासाठी खेळाडूनी शालेय शिक्षण आणि खेळाशी समांतर राहण्याची गरज राज्यपालानी व्यक्त केली. आपल्या संबंधित खेळात उच्च शिखर गाठण्यासाठी होतकरू खेळाडूनी कठोर परिश्रम केले पाहिजे असे राज्यपालानी सांगितले.

      मुख्य सचिव श्री परिमल राय, आयएएस राज्यपालाचे सचिव श्री रूपेश कुमार ठाकूर,आयएएस, शिक्षण सचिवा श्रीमती निला मोहनन, आयएएस, क्रिडा सचिव श्री संजय कुमार, आयएएस आणि क्रीडा संचालक श्री शशांक मणी त्रिपाठी हे यावेळी उपस्थित होते.