राज्यपालांहस्ते राजभवनात एटीएमचे उद्घाटन

0
627

 

 गोवा खबर: राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने राजभवनात बसविलेल्या एटीएम मशीनचे उद्घाटन केले.

     राज्यपालांचे सचिव रूपेश कुमार ठाकूर आयएएस आणि एसबीआयचे उपसरसंचालक  नवीन कुमार गुप्ता हे यावेळी उपस्थित होते.

     याप्रसंगी बोलताना राज्यपालांनी राजभवनात एटीएमची सुविधा सुरू केल्याबद्दल एसबीआयची प्रशंसा केली आणि  राजभवनातील कर्मचारी सदस्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. राज्यपालांनी एसबीआयच्या कर्मचा-यांना आपल्या ग्राहकांबरोबर चांगले संबंध राखण्याचा आदेश दिला. गरजूना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उपजिवीका चालविण्यासाठी आर्थिक साहाय्य देणारी एसबीआय ही एकमेव आर्थिक संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनात एटीएम सुविधा सुरू केल्याने डीजीटलायजेशनच्या दिशेने उचलले एक पाऊल असल्याचे ते म्हणाले.

      रूपेश कुमार ठाकूर यांनी यावेळी बोलताना राजभवनात एटीएम सुविधा सुरू करणे ही राजभवन कर्मचा-यांची दीर्घ काळाची मागणी होती आणि आता ती पूर्ण झाल्याचे सांगितले. राजभवन त्यांच्या दैनंदिन आर्थिक बाबतीत पूर्णपणे कॅशलेस होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

     दोनापावला येथील एसबीआयच्या शाखा व्यवस्थापक श्रीमती लता माशेलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एसबीआयचे उपसरव्यवस्थापक श्री नवीन कुमार गुप्ता यांनी आभार मानले.