राज्यपालांतर्फे विशू व बैसाखीच्या शुभेच्छा

0
881

गोवा खबर: १४ एप्रिल २०१९ रोजी साजर्‍या केल्या जाणार्‍या विशू व बैसाखी उत्सवानिमित्त राज्यपाल डॉ. (श्रीमती) मृदुला सिन्हा यांनी गोमंतकीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 विशू व बैसाखी हे नवीन वर्षाचे सण आहेत. या दोन्ही सणांची नावे जरी वेगवेगळी असली, तरी त्यांच्यामागील भावना एकच आहे. विशू हा सण केरळमध्ये नवीन वर्षाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो.  आध्यात्मिक व सामाजिक अशा दोन्ही रूपांत हा सण आनंद पसरवितो, असे राज्यपाल म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्यातप्रमाणे पंजाबमध्ये यावेळी मोठ्या उत्साहात बैसाखी हा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी खालसा पंथाची स्थापना झाली होती आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणूनही हा सण साजरा केला जातो. या काळात शेतातील पीक तयार असते व म्हणूनच शेतकर्‍यांच्या मेहनतीचे फळ मिळणारा दिवस म्हणूनही याला महत्त्व आहे. चांगल्या वर्षासाठी ईश्वराचे आभार मानण्याचा हा दिवस असतो, असे राज्यपाल म्हणतात.

 भारतात सांस्कृतिक वैविध्य पाहायला मिळते. राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्यात व सामाजिक सलोखा राखण्यात अशा सणांचे फार मोठे योगदान आहे. विशू व बैसाखीचे सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख व समृद्धी घेऊन येवोत अशा शुभेच्छा राज्यपालांनी दिल्या आहेत.