राज्यपालांतर्फे विशू आणि बैसाखीच्या शुभेच्छा

0
317

गोवा खबर:राज्यपाल  सत्य पाल मलिक यांनी १३ एप्रिल २०२० रोजी विशू आणि बैसाखीच्या शुभदिनी गोव्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राचीन काळापासूनआपल्या सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सणांची राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे कारण पुढे आणण्यात महत्त्वाची भूमिका होती, राज्यपालांनी असे त्यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे. विशु हा उत्सव विशेषतः केरळी लोकांचा आहे आणि बैसाखी हा उत्तर भारतातील सर्वात महत्वाचा सण आहेविशेषत: सिख लोकांचा आहे जो उत्साहाने साजरा केला जातो.बैसाखी सणम्हणजे रबी आणि हिवाळ्याच्या पिकांची कापणी केल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात.

कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मी सर्वांना आवाहन करतो की हा उत्सव साजरा करा आणि आपल्या घरातूनच प्रार्थना करा जेणेकरून सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष होणार नाही, असे राज्यपाल श्री. सत्य पाल मलिक यांनी पुढे सांगितले.

यावर्षीच्या विशू आणि बैसाखीच्या उत्सवामुळे लोकांमध्ये अधिक शांती, आनंद, चांगले आरोग्य आणि समृध्दी येईल, असे राज्यपालांनी पुढे सांगितले.