राज्यपालांतर्फे गुरुनाथ नाईक यांना आर्थिक मदत

0
970

गोवा:प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी 50 हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे.गुरुनाथ नाईक हे गेल्या काही वर्षापासून आजारी असून त्यांच्या आजारपणासाठी आर्थिक मदत करावी असे अवाहन नाईक यांच्या पत्नी गीता नाईक यांनी केले होते.त्यानंतर गोवा,महाराष्ट्र आणि देश,विदेशातून नाईक यांना मदत करणारे लोक पुढे येत आहेत.कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीही सरकारतर्फे नाईक यांना आर्थिक मदत करणार असल्याचे जाहिर केले आहे.त्यापाठोपाठ साहित्यिक असलेल्या राज्यपाल सिन्हा यांनी आज गुरुनाथ नाईक यांना 50 हजार रूपयांची आर्थिक मदत करून नाईक कुटुंबियांना दिलासा दिला.राज्यपालांच्या प्रतिनिधिनी नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना धनादेश प्रदान केला.