राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा

0
689

गोवा खबर:गोव्याच्या राज्यपाल डॉ. (श्रीमती) मृदुला सिन्हा यांनी दसऱ्याच्या निमित्ताने गोव्यातील समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, भारत आपल्या संस्कृती व विविध सणांसाठी ओळखला जातो. भारतातील लोक प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.  भारतात साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांमध्ये दसरा हा सर्वात महत्वाचा सण समजला जातो.  दसरा हा सण विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो. ज्याचा अर्थ वाईट शक्तींवर मिळविलेला विजय असा होतो .भगवान  श्रीराम हे सत्याचे प्रतिक तर  रावण वाईट शक्तींचे प्रतिक आहे  तेंव्हापासून भारतातील लोक विजया दशमीला शुभप्रसंग मानतात आणि वाईट प्रवृत्तींवर सत्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून हा दिवस साजरा करतात. हा विजय श्री रामाचाच नव्हे तर हा विजय मानवतेचाही आहे. समाजात क्षोभ निर्माण होऊन मानवतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न होतो तेंव्हाच मानवतेच्या रक्षणासाठी ईश्वरी शक्ती प्रगट होते.   .

दसऱ्याच्या शुभप्रसंगी आपण आपल्यामधील सर्व दुर्गुणांना जाळून टाकण्याची शपथ घेऊया आणि आपल्यामध्ये चांगले विचार रूजवुया ज्यामुळे आपल्याला शाश्वत आनंद मिळेल. या वर्षाचा दसरा सण आपण सर्वांना आनंद, भरभराट आणि शांतता घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.