राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ईद- उल- जुहाच्या शुभेच्छा

0
38

गोवा खबर : गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-जुहाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात “ईद-उल-जुहा किंवा बकरी ईद म्हणजे सर्वोच्च त्यागाचा सण म्हणूनही ओळखला जातो. हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण इस्लामी समाजाचा सण आहे. ईश्वराच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्या मुलाचा त्याग करण्यास इब्राहिमने दाखविलेल्या नम्रतेचे स्मरण यादिनी केले जाते. सर्व धर्म हा प्रेम, शांतता आणि बंधुता या वैश्विक मूल्यांची शिकवण देतो. या सणामुळे विविधतेत एकतेची भावना वाढीस लागो आणि आपल्या देशाची धर्मनिरपेक्षता बळकट होवो.

ते पुढे म्हणतात गोवा एकता आणि जातीय सलोख्याच्या समृद्ध परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. या शुभ प्रसंगी आपण ही गौरवशाली परंपरा टिकवून ठेवूया आणि ती समृद्ध करण्यास वचनबद्द होऊया.

या वर्षी हा शुभ प्रसंग साजरा करताना आपण सर्व आरोग्य शिष्टाचाराचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षित राहुया. हा ईद-उल-जुहा आपण सर्वांना शांतता, भरभराट आणि आनंद घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.