राज्यपालांकडून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

0
784

 

 

गोवा खबर:गोव्याच्या राज्यपाल श्रीमती डॉ. मृदूला सिन्हा यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषतः मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “कृतज्ञता आणि मानवतेची सेवा ही इस्लामची मूलभूत मूल्ये  जी प्रत्येक व्यक्तीच्या अंगी बिंबविलेली आहेत. ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ईदचा उत्सव साजरा केला जातो ज्यामुळे विश्वासूंना एका महिन्यासाठी कडक शिस्त व पूर्ण भक्तीने उपवास करण्यास सक्षम करतो. रमजान हा सण म्हणजे केवळ अन्नपदार्थ व पेय यांच्यापासून दूर राहणे असा नाही तर अनिष्ट बाबी, शब्द आणि कृतींपासून दूर राहणे देखील आहे. तो असे वातावरण निर्माण करून एखाद्याला प्रोत्साहित करतो आणि एक चांगला व्यक्ती बनण्यास मदत करतो. आपल्यासारख्या विविधता असलेल्या देशांत, आंतर धार्मिक सलोखा आणि सहजीवनप्रिय मूल्ये प्रत्येक समाजाच्या विविध घटकांमध्ये  टिकवून ठेवणे व त्यांचे पालन करणे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. म्हणून आम्ही या शुभप्रसंगी पैगंबराच्या चिरस्थायी संदेशापासून प्रेरणा घेऊन सामाजिक सलोखा, राष्टीय एकता आणि अखंडता दृढ करूया.’’

गोवा हे शांतताप्रिय राज्य आहे जिथे विविध धर्माचे लोक सलोख्याने व परस्पर सांमजस्याने राहतात. मी गोव्यातील जनतेला ही उच्च परंपरा टिकवून ठेवण्याचे आवाहन करते असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

 

मुख्यमंत्र्यांकडून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ईद-उल-फित्र हा सण विशेषतः मुस्लिम बांधव साजरा करतात. ईद-उल-फित्र सणाने रमजान म्हणजे उपवासाचा पवित्र महिना संपतो”. हा सण आपल्याला सुख समाधान घेऊन येवो आणि एकता व बंधुता दृढ करो असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.