राज्यपालांकडून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

0
689

 

गोवा खबर: राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषतः मुस्लीम बांधवाना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

       आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, रमजान म्हणजे उपवास करण्याचा पवित्र महिना. ईद-उल-फित्र सणाने रमजान महिना संपतो. गरजूंना दान देण्यास तसेच आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करण्यासाठी ईद-उल-फित्र ही मुस्लीम बांधवासाठी योग्य वेळ आहे. ईद-उल-फित्र म्हणजे प्रेम आणि सद्भावनेचा सण आहे . सर्वावर प्रेम कला आणि व्देष करू नका असा संदेश देणारा हा सण आहे. हा सण आपल्याला बंधुता आणि शांततापूर्ण जीवन जगण्याची शिकवण देतो. व्देष, मत्सर आणि वैर यांच्या निरोप घेऊन प्रेम, सहानुभूती आणि बंधुतेचे युग आणण्याची हा सण अपल्याला शिकवण देतो.

      गोवा हे पारंपारिकदृष्ट्या शांततापूर्ण राज्य आहे जिथे विविध स्तरातील लोक सलोख्याने आणि सामाजिक सामंजस्यांने राहतात. हा समृध्द वारसा स्थिरपणे टिकवून ठेवण्याचे आवाहन मी गोव्यातील लोकांना करतो असे राज्यपाल पुढे म्हणतात. सध्या संपूर्ण देश कोविड-१९ या साथीच्या रोगाने त्रस्त आहे. त्यामुळे मी प्रत्येकांना हा सण आपल्या संबंधित घरामध्ये राहून सामाजिक अंतर पाळून साजरा करण्याचे आवाहन करतो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.