राजेंद्र तालकांची हकालपट्टी करा:कुंकळ्येकर

0
828

गोवाखबर:गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरुन राजेंद्र तालक यांची हकालपट्टी करावी,अशी मागणी गोमंतकीय सीनेनिर्मात्या ज्योती कुंकळ्येकर यांनी आज केली.
गोवा मनोरंजन संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य राखून महाराष्ट्रीयन चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.गोव्यात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिला चित्रपट निर्मात्या असताना त्यांच्या कडे दुर्लक्ष करून भावे चित्रपट महोत्सव आयोजित केल्याने नाराज झालेल्या महिला कलाकार आणि निर्मात्यानी आज पत्रकार परिषद घेऊन तालक यांच्या कृतीचा निषेध केला. तालक हे पदास योग्य नसुन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी कुंकळ्येकर यांनी केली. महिला दिन कार्यक्रमात गोमंतकिय महिलांना दुय्यम ठरवून त्यांच्या कडे केलेल्या दुर्लक्षा बद्दल नाराजी व्यक्त करत कार्यक्रमाचे साधे निमंत्रण देखील नसल्याबद्दल कुंकळ्येकर संताप व्यक्त केला. चित्रपट पुरस्कार योजने बद्दल लावलेले निकष गोमंतकीयांवर अन्याय करणारे आहेत असा आरोप सुचित्रा नार्वेकर यांनी केला. तालक यांची मनमानी थांबली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा नार्वेकर यांनी दिला.