राजधानी पणजीत धूलिवंदनचा मूड नाही…

0
1018
गोवा खबर:पणजीचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे गोव्यावर शोककळा पसरली आहे.सरकारी पातळीवर राज्यभर होणारा शिमगोत्सव पूर्वीच रद्द करण्यात आला आहे.आज धुलीवंदनावरही पर्रिकर यांच्या निधनाची छाप बघायला मिळाली.

पणजी मधील आझाद मैदान यंदा सन्नाटा पसरल्याचे चित्र पहायला मिळाले.दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात धूलिवंदन साजरे केले जाते.
यंदा पणजी मार्केट परिसरात उत्तर भारतीय नागरिक धूलिवंदन खेळत होते.जुन्या मार्केट जवळ रंग, पिचकाऱ्या,फुगे यांची दुकाने थाटण्यात आली होती.तेथून रंग घेऊन उत्तर भारतीय नागरिक होळी खेळत होते.काही विदेशी पर्यटक देखील धूलिवंदनाचा आनंद लूटत असल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जात आहे..