राजधानी पणजीत आज पासून कडक प्लास्टिक बंदी

0
885
गोवा खबर :  राजधानी पणजी शहरात  आजपासून महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकबंदी लागू होत आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ कापडी, कागदी व काथ्याच्या पिशव्या वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
आज पासून शहरात प्लास्टिकबंदी लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जागृतीसाठी महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी यांनी काल सकाळपासून घरोघर तसेच व्यावसायिक आस्थापनांना भेट देण्यास सुरुवात केली. नगरसेवक आपापल्या प्रभागांमध्ये घराघरात भेट देत असून कापडी तसेच काथ्याच्या अथवा कागदी पिशव्या मोफत वाटत आहेत.
प्लास्टिकबंदीबाबत महानगरपालिका ठाम आहे. महानगरपालिकेची बैठक गुरुवारी होऊन येत्या २ ऑक्टोबरपासून शहरात प्लास्टिकबंदी पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ५0 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही वापरता येणार नाहीत.