राजकारणाचा दर्जा खालवण्याऱ्या राणेंच्या प्रमाणपत्राची शिवसेनेनाला गरज नाही:कामत

0
1739
 गोवा खबर:शिवसेनेला अशा कोणत्याच राजकारण्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही जे स्वतः गोव्यातील राजकारणाचा दर्जा खालावायला कारणीभूत ठरले आहेत असे रोखठोक उत्तर शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शिवसेनेच्या दर्जाबद्दल केलेल्या टिकेला दिले आहे.

 गोव्यातील राजकारण्यांनी केलेल्या गलिच्छ राजकीय खेळीमुळेच पुर्ण देशात गोव्यातील राजकारण बदनाम असून गोव्याच्या राजकीय घडामोडी वाईट उदाहरण म्हणून वापरतात हा गोव्यातील सभ्य, सुशिक्षित आणि फर्स्ट क्लास दर्जा असलेल्या लोकांचा अपमान असल्याची खंत कामत यांनी व्यक्त केली आहे.
 सध्या विश्वजीत ज्या भाजपात आहे तो पक्षही १९९४मध्ये शिवसेनेसोबत युती केल्यामुळेच विधानसभेत पोहोचला याचे विश्वजीत राणेंना बहुतेक विस्मरण झाले असणार अशी खोचक टीका कामत यांनी केली आहे.
 शिवसेना पक्षाला ख्रिस्ती बांधव जवळ करणार नाही असे विधान करून विश्वजीत यांनी स्वत:चे अज्ञान पाझरले असल्याची टीका कामत यांनी केली आहे.
शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित संघटना आहे आणि गोवा राज्य शिवसेनेत कित्येक पदाधिकारी ख्रिस्ती असून मुंबईत बहुसंख्य ख्रिस्ती बांधव शिवसैनिक असल्याचे कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.