राघव चड्ढा यांनी निलेश काब्राल यांचे आव्हान स्वीकारले!

0
160
 • वीजेबाबतचे मोठे चर्चासत्र २.०
 • काब्राल पुन्हा पळ काढतील का, आपचा सवाल?
  गोवा खबर : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आम्ही सत्तेत आल्यास गोव्याला 300 युनिट मोफत वीज 24 तास मिळेल या केलेल्या घोषणेनंतर सर्व भाजपा हादरली आहेत. याचा ज्या व्यक्तीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे ते म्हणजे गोव्याचे ऊर्जामंत्री नीलेश काब्राल हे आहेत.
  त्यांचे मंत्रालय गोमंतकीयांना मोफत 24/7 वीज प्रदान करण्यास का सक्षम नाही, अशा प्रश्नांचा सामना काब्राल यांना करावा लागत आहे. काब्राल यांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांना भाजप आणि केजरीवाल यांच्या कारभाराचे मॉडेल यांच्यात झालेल्या चर्चेसाठी आव्हान दिले आहे. चड्ढा यांनी आज हे आमंत्रण स्वीकारले आणि काब्राल यांना कोठे व कधी चर्चा करायला आवडेल असा प्रश्न विचारला.
  हे लक्षात आणून द्यावे लागेल की, गेल्या वेळी जेव्हा काब्राल यांनी हे आव्हान जारी केले होते, तेव्हा ते लपून बसले होते, कारण राघव चड्ढा त्याच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. आम आदमी पक्षाला याबाबत कुतूहल असेल की, यावेळी श्री. काब्राल चर्चेला सामोरे जातील का ?
  “श्री. अरविंद केजरीवाल यांनी आप सत्तेत येताच गोव्याला 24/7 अखंडित 300 युनिट मोफत वीज देणार हे जाहीर केले, तेव्हापासून भाजपला चिडचिड झाली आहे.” राघव म्हणाले. “पुन्हा एकदा उर्जामंत्री निलेश काब्राल यांनी मला त्यांच्याबरोबर वीजेच्या विषयावर चर्चेसाठी आमंत्रित केले आहे आणि मला ते आमंत्रण स्वीकारण्यात आनंद होत आहे! मी चर्चेची वेळ आणि स्थान याची उत्सुकतेने वाट पाहत आहे!” चड्ढा म्हणाले.
  “काब्राल आणि सावंत हे ज्या भाजपा मॉडेलविषयी बोलतात त्याविषयी  आणि केजरीवाल मॉडेल ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवले याची एक स्वतंत्र आणि प्रामाणिक चर्चा होऊ द्या. मला वाटते की,संपूर्ण गोवा उत्सुकतेने या चर्चेची वाट पाहत आहेत.”
  गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी गोवा भेटीत गोव्यासाठी मोठी घोषणा केली होती की, आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास राज्यात 24×7 अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करतांना राज्यात 300 युनिटपर्यंत नि: शुल्क वीज देण्यात येईल. ते म्हणाले की, सर्व जुनी वीज बिले माफ केली जातील आणि शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. आपल्या घोषणेला महत्त्व देताना आपचे राष्ट्रीय संयोजक म्हणाले की, आपण कोणतीही पोकळ निवडणुकांची आश्वासने देत नाही, हे सर्व दिल्लीत लागू केले गेले आहे आणि दिल्लीतील 73% कुटुंबांना शून्य बिले मिळतात आणि गोव्यात याची अंमलबजावणी झाल्यावर गोव्यातील 87% लोकांना शून्य वीज बिल मिळेल.