रस्त्यावरील भिकारी व बेघराना त्वरित निवारा केंद्रात हलवा : दिगंबर कामत यांची मागणी

0
383
गोवा खबर: मडगाव शहरात कोविडमुळे दुसरा भिकारी मरण पावल्यानंतर अशा भिकारी व बेघरांपासुन कोविडचा फैलाव होऊ शकते असे संपुर्ण गोव्यातील लोकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला, सार्वजनीक जागा तसेच खुल्या मैदानावर निवारा घेणारे बेघर व भिकारी याना सरकारने त्वरित ताब्यात घेऊन त्याना निवारा केंद्रात न्यावे अशी मागणी कामत यानी केली आहे. 
मडगावातील समस्ये बद्दल दक्षिण गोवा जिल्हाधीकाऱ्यांसोबत  आज बैठक घेऊन या बेघर व भिकाऱ्यांना त्वरित निवारा केंद्रात नेण्याचा मागणी केली आहे. गोव्यातील अनेक भागातुन मला लोकांनी फोनवरून संपर्क साधुन, राज्यात अनेक शहरात ही समस्या असल्याचे सांगीतले व खास करुन ट्रॅफीक सिग्नलवर असे लोक मोठ्या संख्येने जमतात असे लक्षात आणुन दिले असे  कामत यानी सांगीतले.
दक्षिण गोवा जिल्हा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांचे लक्ष वेधुन एसजिपीडिए मैदानावर उभारण्यात आलेले बेकायदा निवारे त्वरित काढुन टाकावेत अशी मागणी त्यांच्याकडे केल्याचे कामत म्हणाले.

सरकारने या सर्व लोकांना निवारा केंद्रात नेल्यानंतर त्याना त्यांच्या  मूळ गावांत  पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही  कामत यानी केली आहे.