रशियाच्या भारतातल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य मंत्र्यांकडून फास्ट ट्रॅक यंत्रणेची घोषणा 

0
1010
The Prime Minister, Shri Narendra Modi meeting the President of Russian Federation, Mr. Vladimir Putin, in New Delhi on October 04, 2018.

 गोवा खबर:रशियाच्या भारतातल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी फास्ट ट्रॅक एक खिडकी यंत्रणा उभारण्याची घोषणा केली आहे. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

भारत-रशिया व्यापार शिखर परिषदेत ते आज बोलत होते. औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खाते, इन्हवेस्ट इंडिया आणि भारतीय उद्योग महासंघ यांनी नवी दिल्लीत ही शिखर परिषद आयोजित केली आहे.

भारतात, रशियाच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी या आधीच्या रशिया डेस्क व्यतिरिक्त ही फास्ट ट्रॅक यंत्रणा राहणार आहे.

हायड्रोकार्बन, सोने, हिरे,लाकूड,कृषी,वीज निर्मिती, हवाई वाहतूक, रेल्वे आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रात सहकार्याची भारत आणि रशिया यांना संधी असल्याचे प्रभू म्हणाले.

इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर संदर्भात काम सुरु आहे. युरेशियन इकॉनॉमिक युनियन समवेत मुक्त व्यापार करारावर लवकरच स्वाक्षऱ्या केल्याने मोठी बाजारपेठ निर्माण होणार असून या क्षेत्रातल्या देशांना त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर भारतातली राज्ये आणि रशियाच्या प्रांतातल्या भागीदारीलाही यामुळे प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी सांगितले.

भारताबरोबरचे आर्थिक सहकार्य वाढविण्याचे धोरण रशिया आखत आहे. भारतासमवेत गुंतवणूक, संरक्षण आणि दुहेरी कर टाळण्यासाठीच्या करारासाठी रशिया उत्सुक असल्याचे रशियाच्या आर्थिक विकास मंत्र्यांनी सांगितले.

आर्थिक भागीदारी हा भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांचा भक्कम स्तंभ बनवण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या दोन दिवसांच्या भारत भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत आतापर्यंतचे सर्वात मोठे रशियन प्रतिनिधीमंडळ भारतात आले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशिया यांच्यातले करार/सामंजस्य करार 

अनु. करार/सामंजस्य कराराचे नांव रशियाचे मंत्री/अधिकारी भारताचे मंत्री/अधिकारी
1. भारत आणि रशिया यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात 2019-2023 या काळासाठी सल्लामसलतीबाबतचा करार परराष्ट्र व्यवहार मंत्री लाव्हरोव परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज
2. रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय आणि भारताचा नीति आयोग यांच्यातला सामंजस्य करार आर्थिक विकास मंत्री मॅक्सिम ओर्शेकिन नीति आयोगाचे उपाध्यक्ष

राजीव कुमार

3. भारतीय अंतराळ संशोधन संस्था,इस्रो आणि फेडरल स्पेस एजन्सी,रशिया ‘ROSCOSMOS’ यांच्यात मानवासहित अवकाश भरारी कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार ‘ROSCOSMOS’ चे संचालक

दिमित्री रोगोझिन

परराष्ट्र सचिव

विजय गोखले

4. भारत आणि रशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातला सहकार्य करार जे.एस.सी रशियन रेल्वेचे अध्यक्ष,

ओलेग बेलोझेरोव्ह

परराष्ट्र सचिव

विजय गोखले

5. आण्विक क्षेत्रात संकल्पना आणि सहकार्य अंमलबजावणी संदर्भातला कृती आराखडा रोसाटोमचे महासंचालक ॲलेक्सी लिखाचेव डी.ए.ई सचिव के.एन. व्यास
6. परिवहन शिक्षण क्षेत्रात सहकार्य विकासाबाबत रशियाचे परिवहन मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांच्यातला सामंजस्य करार रशियाचे भारतातले राजदूत

निकोलाय कुदाशेव्ह

भारताचे रशियातले राजदूत

डी.बी.व्यंकटेश वर्मा

7. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारताच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ  (एनएसआयसी) आणि रशियाच्या लघु आणि मध्यम व्यापार महामंडळ (आरएसएमबी) यांच्यातला सामंजस्य करार आरएसएमबीचे महासंचालक

अलेक्झांडर ब्रेव्हरमॅन

भारताचे रशियातले राजदूत

डी.बी.व्यंकटेश वर्मा

8. खत क्षेत्रात रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंड (आरडीआयएफ),आणि पीजेएससी फॉसॲग्रो आणि इंडियन पोटॅश लिमिटेड आरडीआयएफचे महासंचालक

किरील दिमित्रीव्ह,

फॉसॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲन्ड्रे गुर्रेव्ह

भारताचे रशियातले राजदूत

डी.बी.व्यंकटेश वर्मा